राष्ट्रपती भवनाकडून रविवारी (12 फेब्रुवारी) सकाळी प्रेसनोटद्वारे अत्यंत महत्वाची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी देशातील एकूण 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारुन त्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. ( President Draupati Murmu Appointed 12 State Governors And 1 Union Territory Lieutenant Governor Including Maharashtra )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य आणि नवीन राज्यपाल
1. महाराष्ट्र – रमेश बैस
2. बिहार – राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
3. आंध्र प्रदेश – निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर
4. छत्तीसगड – बिस्व भूषण हरिचंदन
5. झारखंड – सीपी राधाकृष्णन
6. हिमाचल प्रदेश – शिवप्रताप शुक्ला
7. अरुणाचल प्रदेश – लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक
8. सिक्कीम – लक्ष्मण प्रसाद आचार्य
9. आसाम – गुलाबचंद काटरिया
10. नागालँड – ला गणेशन
11. मेघालय – फागु चौहान
12. मणीपूर – अनुसुईया उकिये
आणि
13. लडाख (केंद्रशासित प्रदेश) – बीडी मिश्रा (नायब राज्यपाल)
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी पायउतार, रमेश बैस असणार नवे राज्यपाल, वाचा अधिक
– मावळ भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याचे नियोजन