Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची राज्यासह केंद्र सरकारनेही तातडीने दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच घटनास्थळी मदतकार्याच्या सूचना दिल्या. राज्य सरकारनेही तातडीने मदतकार्य सुरू केले, यामुळे होणारी हानी कमी झाली. ( Kundmala Indrayani River Bridge Accident )
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच आवश्यक ती मदत केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यासह दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
अमित शाह यांच्याकडून मदतकार्याबद्दल सूचना
गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच बचावकार्यासाठी सर्व यंत्रणांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. यासह दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काय म्हणाले अमित शाह –
अमित शाह यांनी एक्सवर (जुने ट्विटर) पोस्ट केली आहे. “पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेने खूप दुःख झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि सध्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. जवळच तैनात असलेल्या एनडीआरएफ पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्यात सहभागी झाले आणि उल्लेखनीय तत्परतेने अनेकांचे जीव वाचवले. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना.”
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती
– कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू
– कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident