व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून रविवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला. तर एकूण 51 जण जखमी झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच झालेल्या या भीषण दुर्घटनेने मावळ तालुका हादरला आहे. दरम्यान रविवारी रात्री उशीरापर्यंत याठिकाणी बचावकार्य व शोधकार्य सुरू होते. याबद्दल राज्यासह देशभरातील अनेक नेते मंडळींनी प्रतिक्रिया देत घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून या दुर्घटनेबद्दल आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे? वाचा त्यांची ‘एक्स’ पोस्ट
“काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’

पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– BREAKING : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती
– कुंडमळा पूल दुर्घटना : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 51 जखमी, अजुनही शोधकार्य सुरू
– कुंडमळा येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार । Kundmala Indrayani River Bridge Accident


dainik maval jahirat

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

Next Post

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार... राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त - एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.