Dainik Maval News : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2024 बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि.22) संपन्न झाला. तळेगाव दाभाडे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे व पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अबोलीताई मयूर ढोरे उपस्थित होत्या. तसेच प्रमुख वक्ते अविनाश भेगडे यांनी स्त्री- संरक्षण, हिंदूधर्म, संस्कृती, संस्कार, नागरी शिष्टाचार या विषयांवर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद टकले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर खळदे यांनी मनोगत व्यक्त केले. महादेव खरटमल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संजय शिंदे यांनी, तर विजयराव शेटे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचलन मयूर पिंगळे, धनश्री शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संचालक आदित्य टकले, सतीश गरुड, सदाशिव भोसले उपस्थित होते. पतसंस्था व प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव – आढले मार्गावर नवीन एसटी, ओवळे एसटीच्या रविवारी दोन फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश । Maval News
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराची सांगता ! नऊ दिवसात अर्ध्या लाखाहून अधिक मावळकरांनी घेतला आरोग्यसेवांचा लाभ
– पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर