रायगड : राज्यासह देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले लोणावळा शहर आणि या शहराजवळील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे खोपोली शहर आणि तेथील विविध ठिकाणे. या ठिकाणी वर्षाविहार आणि पर्यटन करिता जाणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती आहे.
खोपोली हद्दीतील झेनिथ धबधबा आणि आडोशी गावचे हद्दीतील आडोशी धबधबा आणि आडोशी पाझर तलाव हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सन 2021 पावसाळी हंगामात झेनिथ धबधबा व परिसर या ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील 3 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यूमुखी पडले होते. तसेच अनेकवेळा सदर ठिकाणी अनेक पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीपात्रात अडकले होते.
झेनिथ धबधबा व आडोशी धबधबा या ठिकाणी सुरक्षा ”व्यवस्थेचा अभाव” असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सदर परिसर हा धोकादायक असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते. या कारणांमुळे झेनिथ धबधबा”, “आडोशी धबधबा” ही पर्यटन स्थळे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने ह्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) अन्वये मनाई आदेश मा.उपविभागीय अधिकारी कर्जत, यांनी दि. 16 जून 2023 ते दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी जारी केला आहे. ( prohibitory orders have been issued under Section 144 – 1 at tourist spots khopoli Zenith Falls Adoshi Falls and Pazar Lake )
खालील निर्बंध होणार लागू…
या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघडया जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. पावसामुळे वेगाने वाहणान्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जिवित हानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे.सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धरण / तलाव / धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात दुचाकी / तीन चाकी / चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), या अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. असे आवाहन शिरीष पवार, पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे यांनी केलेले आहे.
अधिक वाचा –
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट? पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 2 आरोपींना अटक । Kishor Aware Murder Case