Dainik Maval News : धरणांतील गाळ काढल्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढते. याबरोबरच पूर नियंत्रणासाठी याची मदत होत असल्याने या कामास जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
धरणातील गाळ काढण्याबाबतच्या प्रस्तावाच्या सद्यस्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. गुणाले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव प्रसाद नार्वेकर, संजीव टाटू, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील म्हणाले, धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव परिपूर्ण असावा. या प्रस्तावाबाबत वित्त व नियोजन विभागाने केलेल्या सूचनांची पूर्तता करून याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही मंत्री विखे – पाटील यांनी दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित