Dainik Maval News : पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीएने १५० प्रस्तावित रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. मावळ, मुळशी, हवेली व शिरूर तालुक्यांतील अनेक रस्त्यांचा समावेश असून, ८५ हेक्टर क्षेत्रावर आरक्षित भूखंडासाठी देखील जमीन अधिग्रहण होणार आहे.
- पुणे महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आली आहे. ८५ हेक्टर क्षेत्रावरील आरक्षित भूखंडासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ, हवेली, मुळशी आणि शिरूरसह अनेक प्रमुख तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश असून, पुणे महानगर क्षेत्राच्या ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नियोजित शहरी विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पुणे महानगर क्षेत्रातील शहरी भागांचा झपाट्याने विस्तार होत आहे. यातील बहुतांश भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. त्यादृष्टीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया २८ मे पासून पीएमआरडीएने सुरू केली आहे.
याकरीता एका सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठीची निविदाही काढण्यात आली असून, या कंपनीकडून पायाभूत सुविधांचा विकास, आरक्षणांसह भूसंपादन केले जाईल. सल्लागार संस्थेकडून भूसंपादन, पुनर्वसन, जमिनींचे अनिवार्य संपादन, थेट खरेदी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. तसेच जमीन अधिग्रहण प्रस्ताव तयार करणे, संरचना, झाडे आणि विहिरींसाराख्या बाधित मालमत्तेच्या नुकसानभरपाईचा अंदाज निश्चित करणे, संयुक्त मोजणी सर्वेक्षणावेळी मदत करणे, अशी कामे सल्लागार कंपनीकडून केली जाणार आहेत.
सल्लागार संस्थेकडून भूसंपादन, पुनर्वसन, जमिनींचे अनिवार्य संपादन, थेट खरेदी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. तसेच जमीन अधिग्रहण प्रस्ताव तयार करणे, संरचना, झाडे आणि विहिरींसाराख्या बाधित मालमत्तेच्या नुकसानभरपाईचा अंदाज निश्चित करणे, संयुक्त मोजणी सर्वेक्षणावेळी मदत करणे, अशी कामे सल्लागार कंपनीकडून केली जाणार आहेत. तीस महिन्यांच्या कालावधीत ही सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित असून सल्लागाराची अंतिम नियुक्ती झाल्यांतर पंधरा दिवसांमध्ये कामे सुरू करता येणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
– आनंदाची बातमी ! मावळ तालुक्यातील २४ शाळा बनणार ‘आदर्श शाळा’ ; २० कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
– वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती