Dainik Maval News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकवे नाणे गटात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना, या गटाचे प्रमुख दावेदार म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक दाते यांनी आपल्या सहकार्यांसह कुसुर, खांडी, सावळे आणि माळेगाव या गावांना सदिच्छा भेट दिली. काकड आरतीच्या समाप्तीनंतर आयोजित केलेल्या काल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. दाते यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान गावागावात भक्तिभावाचे आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी उत्साहाने स्वागत करत, फुलांचा वर्षाव केला. महिला वर्गाने औक्षण करून डॉ. दाते यांना शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. गावातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांच्या अडचणी, शालेय सोयीसुविधा आणि महिला स्वयंसहायता गटांच्या उपक्रमांवर सविस्तर संवाद झाला.
डॉ. अशोक दाते यांनी या संवादादरम्यान सांगितले की, टाकवे नाणे गटाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास असून, नागरिकांच्या प्रत्येक समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव कटिबद्ध आहेत. “सेवा हीच माझी खरी ओळख आहे, आणि विकास हा माझा धर्म आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकीय वातावरण काहीसे प्रतिकूल असतानाही, डॉ. दाते यांच्या या दौऱ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ग्रामस्थांच्या मनात त्यांच्याबद्दल निर्माण झालेला विश्वास आणि आत्मीयता ही त्यांच्या जनसंपर्काची खरी ताकद ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत टाकवे नाणे गटातून डॉ. अशोक दाते यांची उमेदवारी अधिक बळकट होताना दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार
