Dainik Maval News : प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस विक्रम कदम यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी आमदार राजेश विटेकर, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस विक्रम कदम, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामदास वाडेकर, सुदन सुरेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मागील दहा वर्षापासून विक्रम कदम यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे.
विक्रम कदम यांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे अजित पवार यांनी कौतुक केले. कदम म्हणाले, मला अजितदादांचा आशीर्वाद नेहमीच मिळत असतो. त्याबद्दल खास करून दादांचे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार या सर्वांचे मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने आभार व्यक्त करतो. नवीन वर्षामध्ये दादांनी खूप शुभेच्छा दिल्या.
राज खांडभोर म्हणाले, ‘दादांनी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. त्याचबरोबर मावळ तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार पक्षाचे आमदार म्हणून सुनील शेळके यांना भरघोस मतांनी निवडून दिले, त्याबद्दल देखील दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे व सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.’
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या