Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, शिरूर, मुळशी, भोर आणि राजगड या तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी व दादर फुल व्यापारी असोसिएशनचे व्यावसायिक यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाची भव्य सभा घेण्यात आली. तसेच नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली.
या वेळी आमदार सुनील शेळके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले व त्यांनी नव्या संघटनेला मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. त्यांनी फुलशेतीचा वाढता व्याप आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अशा संघटनेची गरज भासल्याचे सांगितले.
नव्या असोसिएशनने दादर येथील व्यावसायिकांसोबत व्यवहार अधिक सुरळीत व्हावेत यासाठी चर्चा केली. तसेच कृत्रिम फुलांवरील बंदी व त्यासाठीचे पुढील नियोजन यावरही विचारविनिमय झाला.
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊस फुलशेती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अशा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सभेत प्रगतिशील शेतकरी दिगंबर राक्षे, संदीप मराठे, मुकुंद ठाकर, मंगेश खापे, पांडुरंग शिंदे, सोमनाथ चोरगे, रोशन पिंगळे आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे उत्कृष्ट नियोजन नितीन जगताप यांनी केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम