पुणे जिल्ह्यातील ( Pune ) मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) चांदखेड ( Chandkhed ) या एकमेव ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतीचा निकाल आता समोर आला असून इथे श्री संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलने निवडणूकीत बाजी मारली आहे. एकूण 11 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत श्री संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलचे तब्बल 9 सदस्य घवघवीत मतांनी निवडून आले आहेत.
मीना दत्ताञय माळी यांची भरघोस मतांनी थेट जनतेतून सरपंच पदी निवड….
चांदखेड ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचपदासाठी प्रत्यक्ष झालेल्या एकूण 2,355 मतदानापैकी मीना दत्तात्रय माळी यांच्या पारड्यात 1486 मते पडली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या अरुणा महेंद्र आगळे यांना 844 मते पडली. तर 25 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. त्यामुळे एकूण 642 मतांची आघाडी घेत मीना दत्तात्रय माळी या सरपंचपदी निवडून आल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पाहा संपूर्ण निकाल… प्रभाग.. आरक्षण आणि विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 1
1. अनुसूचित जमाती स्त्री – उर्मिला संदिप गावडे
2. सर्वसाधारण – प्रमोद बबन गायकवाड
3. सर्वसाधारण स्त्री – प्रियंका ओमकार गायकवाड
प्रभाग क्रमांक 2
4. अनुसूचित जाती स्त्री – पुजा तेजस कांबळे
5. सर्वसाधारण – तेजस दत्तात्रय बावकर
प्रभाग क्रमांक 3
6. अनुसूचित जमाती – दादाभाऊ सुदाम केदारी
7. नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – पुजा अमित कदम*
8. सर्वसाधारण स्त्री – रुपाली दिनेश गायकवाड*
प्रभाग क्रमांक 4
9. अनुसूचित जाती – सागर तानाजी कांबळे
10. सर्वसाधारण – सागर दिलीप गायकवाड
11 सर्वसाधारण स्त्री – वृषाली उमेश गायकवाड
प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) – पुजा अमित कदम* आणि सर्वसाधारण स्त्री – रुपाली दिनेश गायकवाड* हे दोन विजयी उमेदवार वगळता बाकी सर्व उमेदवार हे श्री संत रामजीबाबा ग्रामविकास पॅनलचे आहेत. ( Pune District Maval Taluka Chandkhed Gram Panchayat Results Announced GramPanchayat Election 2022 )
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान झाले. सर्व ठिकाणी मिळून सरासरी 74 टक्के मतदान झाले. या मतदानाची आज (सोमवार, 17 ऑक्टोबर) रोजी मतमोजणी होती. सत्तांतरानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचपदासाठी झालेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
अधिक वाचा –
मावळमध्ये कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश, नियोजनात्मक शेतीमुळे भातपिक जोमात, पावसाच्या तडाख्यापासूनही बचाव
Video : पवनानगर येथील कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती, आमदार शेळकेंचा वाढदिवसही साजरा