Dainik Maval News : कान्हे (ता. मावळ) येथील युवा उद्योजक शुभम गुलाब सातकर यांना त्यांच्या सामाजिक कामांबद्दल महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. शुभम सातकर यांच्या यशाबद्दल मावळ तालुक्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभम सातकर हे २०२० साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील ग्रामपरिवर्तन अभियानात मुख्यमंत्री प्रतिनिधी (फेलोशिप) म्हणून काम करत असताना त्यांनी जुन्नर तालुक्यातील काळवाडी गावात शेतकऱ्यांना संघटित करून फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करण्यात महत्वाचे योगदान दिले होते. तसेच , काळवाडी गावची १००% शासकीय मोजणी करण्यात त्यांना यश आले होते.!
शुभम सातकर हे त्यांनी स्थापन केलेल्या प्रोलिफिक मीडिया हाऊसच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ब्रँड्सना ओळख निर्माण करून देत आहेत. आजमितीला महाराष्ट्रासह देशभरात विविध ब्रँड्स प्रोलिफिक मीडिया हाऊसशी जोडले गेले आहेत. एक उद्योजक म्हणून अनेक तरुणांच्या हाताला काम देण्यात शुभम सातकर यांचे बहुमूल्य योगदान आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha