Dainik Maval News : मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक येत्या २७ एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास गुरुवारपासून (दि. २० मार्च) सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि. २६ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाचे २ हजार ८३७ सभासद असून, पाच मतदार संघात संचालकांच्या एकूण ११ जागा आहेत. त्यात सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ ६ जागा (खनिज आधारित उद्योग १, वनावर आधारित उद्योग १, कृषी आधारित व खाद्य उद्योग १, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग १, अभियांत्रिकी व अपारंपरिक उद्योग १, वस्त्रोद्योग व सेवा उद्योग १), महिला प्रतिनिधी २ जागा, अनुसूचित जाती व जमाती मतदार संघ १ जागा, इतर मागास
वर्ग मतदार संघ १ जागा, भटक्या जमाती/विमुक्त जाती मतदार संघ १ जागा आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
२० ते २६ मार्च (सकाळी ११ ते दुपारी ३, सुट्टीचे दिवस वगळून) – उमेदवारी अर्ज दाखल करणे,
२७ मार्च – उमेदवारी अर्जांची छाननी,
२८ मार्च – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख,
२७ एप्रिल – मतदान (सकाळी ९ ते दुपारी ४)
मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात येणार असून, निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा