पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने वडगाव मावळ शहरात वेटलिफ्टिंग स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन रविवारी (दिनांक 11 जून) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांच्या सौजन्याने श्री. रमेशकुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कुल वडगाव-मावळ इथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ( pune guardian minister chandrakant patil inaugurate weightlifting competition in vadgaon maval )
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात चंद्रकांत पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत असताना शिंदे-फडणवीस सरकारची खेळाडू आणि खेळ यांबाबत असलेली धोरणे यावर भाष्य केले. सदर कार्यक्रमाला गणेश भेगडे, रविंद्र भेगडे, भास्कर म्हाळसकर, अविनाश बवरे, अनंता कुडे, राजू खांडभोर, सायली बोत्रे, शांताराम कदम, संतोष कुंभार, अभिमन्यू शिंदे आदींसह विद्यार्थी, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगावातील विविध विकासकामांचे चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन; दिवंगत नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या वॉर्डात 1.53 कोटींचा निधी
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव शहरात रक्तदान शिबिर, 76 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग । Vadgaon Maval