तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची शुक्रवार (दिनांक 12 मे) रोजी तळेगाव नगरपरिषदेसमोर हत्या झाली होती. आज (मंगळवार, दिनांक 16 मे) पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आवारे कुटुंबियांचे सांत्वन केले. ( Pune Guardian Minister Chandrakant Patil pays tribute to Kishor Aware )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी किशोर आवारे यांच्या आई, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
जनसेवा समितीचे संस्थापक आणि तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आज आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आवारे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी… pic.twitter.com/qy799PTpXo
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) May 16, 2023
यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ( Talegaon Dabhade Kishor Aware Murder Case )
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर