पिंपरी ते दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान असलेले कासारवाडी येथील रेल्वे फाटक रस्ते वाहतुकीसाठी 16 ते 20 ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कळवण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरील या रेल्वे फाटकाच्या विभागात आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येणार असल्याने पाच दिवसांच्या कालावधीत संध्याकाळी पाचपर्यंत रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी जवळच असलेला रेल्वे भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी माध्यमातून बंदच्या कालावधीत वाहतूक करावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ( Kasarwadi Railway Gate Closed For Five Days )
अधिक वाचा –
Video : पवनानगर येथील कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती, आमदार शेळकेंचा वाढदिवसही साजरा
अपघातवार..! पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एक किलोमीटर अंतरात 2 अपघात, 2 चालक दगावले