व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिमुकल्या आदित्यचा खून, संपूर्ण प्रकरण मन सुन्न करणारं, पैसा इतका मोलाचा असतो?

पैशाचा हव्यास, राग आणि सुडबुद्धी यांचा मिलाफ झाला तर काय होऊ शकतं, याची थरारक घटना नुकतीच पुण्यातील पिंपरी भागात घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 11, 2022
in पुणे, शहर
Child-Murdered

Child Brutally Murdered in Pimpri ( Police )


पैशाचा हव्यास, राग आणि सुडबुद्धी यांचा मिलाफ झाला तर काय होऊ शकतं, याची थरारक घटना नुकतीच पुण्यातील पिंपरी भागात घडली. या सर्व प्रकरणात एक निरपराध चिमुकला आदित्य मात्र जिवानिशी गेला आहे.

आदित्य याचा खून त्याच्याच बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मंथन भोसले या इंजिनीयर तरूणाने केला. त्यासाठी मंथन याने त्याची कुशलता पणाला लावली होती. अगदी सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करण्याचे नाटकही त्याने केले. मात्र सत्य कधी लपत नाही म्हणतात त्या प्रमाणे मंथन याचे पितळ अखेर उघडे पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ( Aaditya ) याचे अपहरण करण्याचे मंथन याने 15 दिवसांपासून ठरवले होते. यासाठी त्याने त्याचा शाळेतला मित्र अनिकेत समदर यालाही बोलावून घेतले. समदर भोसलेच्या मदतीला धावून येण्याचे कारणही तसेच होते. मंथन हा बारावी झालेला असला तरी अनिकेत मात्र बारावीच शिकला होता. त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले व मुंबईला स्थलांतरीत झाला. मात्र, लग्नानंतर त्याला पैशांची गरज भासत होतीच. याच गरजेला मंथनने पैशांचे आमिष दाखवले. म्हणजे ओगले कुटुंबीयावरचा रागही निघेल आणि पैसेही मिळतील. यासाठी त्याने मागील पंधरा दिवसांपासून कट रचन्यास सुरुवात केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडिलांची कार घेतली. तिच्या काचांना काळ्या फिती लावल्या, मित्रही तोपर्यंत पिंपरीत आला होता. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाहीत असा पार्किंगचा कोपरा हेरून ठेवला. आता वेळ होती आदित्यचे अपहरण करण्याची! त्यासाठी दोन वेळा प्रयत्नही केले, मात्र ते फसले. मग अजून थोडा अभ्यास केला असता आदित्य याची आत्या त्या बिल्डींगमध्ये राहते व तिचा आदित्यवर विशेष लळा होता हे मंथनला माहिती झाले.

त्याचाच फायदा घेऊन गुरुवारी आदित्य खाली खेळायला येताच अनिकेत याने आदित्यला आत्याने बोलावले आहे, म्हणून सोबत गाडीजवळ नेले. गाडीत बळजबरी बसवताना आदित्यने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी मंथन याने रागाने आदित्यचे तोंड दाबले व एका हाताने त्याचा गळाही दाबला. यातच आदित्यचा मृत्यू झाला. ( Child Brutally Murdered in Pimpri )

मंथन व त्याचा मित्र यांना गांजा सिगारेट याचेही व्यसन असल्याचे समोर आले. यासाठी तो व त्याचे मित्र एमआयडीसी भोसरी येथे बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात व्यसन करण्यासाठी जात होते. त्याच बिल्डींगच्या छतावर आदित्यचा मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आला.

हेही वाचा –निवासी डॉक्टर नसल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू, कामशेतमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान, पोलिसांपर्यंत गोष्ट गेली असता पोलीस सोसायटीमध्ये चौकशीसाठी आले. तोपर्यंत मंथन मृतदेहाची विल्हेवाट लावून बिल्डींगमध्ये परत आला होता. यावेळी पोलिस चौकशी करत असताना तो त्यांच्या आसपास फिरकत सहकार्य करण्याचे नाटक करत होता. पोलिसांची उशिरापर्यंत तपासणी सुरु असताना तो तेथून चिखली येथे एका मोबाईलच्या दुकानात गेला. तिथे एक कामगार त्याचा मोबाईल घेऊन आला होता. यावेळी त्याने त्याचे चलाख डोके वापरून त्या कामगाराला माझा माबाईल हँग झाला आहे, मला थोडं मोबाईलचे काम आहे सांगून मोबाईल घेतला.

त्या कामगाराच्या फोनवरून त्याने आदित्यच्या बाबाला रात्री एक वाजता 20 कोटींची खंडणी मागितली. या एसएमएसने पोलिसांची तपासाची दिशाच फिरली. तरी पोलिसांचे एक पथक सोसायटीतील सर्वांची कसून चौकशी करत होते. माहिती घेत होते. यावेळी मंथनच्या वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मंथन व ओगले कुटुंबीयांचे काही महिन्यांपूर्वी जोरदार भांडण झाले होते.

तो सोसायटीत सर्वांना थोडा त्रास देत होता यासाठी त्याला सहा महिन्यांसाठी मामाच्या गावाला सोडल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर प्रकरण मिटले असे सर्वांना वाटले होते. याचाच आधार घेऊन पोलिसांनी मंथनला चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याची उत्तरे काही विसंगत वाटत असल्याने पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.

हेही वाचा – ‘हे असले काही खपवून घेणार नाही’, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, दिले मोठे आदेश

ओगले यांच्यावरील राग तसेच 20 कोटी मागितले, तर किमान तीन ते चार लाख तरी मिळतील म्हणून हा कट रचल्याचे त्याने कबुल केले. मात्र, या घटनेने केवळ ओगले कुटुंब नाही तर मंथनचे भोसले कुटुंब व पूर्ण सोसायटी हादरली आहे. त्यामुळे आपले मुले नेमके काय करत आहे? याकडे प्रत्येक पालकाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. ( Pune Pimpri 7 Year Old Aaitya Brutally Murdered For Ransom Of 20 Crores Neighbors Arrested )

अधिक वाचा –
वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या


Previous Post

गोधनेश्वर मंदिर : मावळच्या डोंगररांगात लपलेलं अद्भुत रहस्य

Next Post

लोणावळा शहरात विसर्जन मिरवणूकीनंतर सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून महाप्रसादाचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maha-Prasad-By-ShivSena-Lonavla

लोणावळा शहरात विसर्जन मिरवणूकीनंतर सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून महाप्रसादाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.