Dainik Maval News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून पुणे रिंग रोड ( Pune Ring Road ) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शुक्रवारी (दि.4 ऑक्टोबर) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रिंगरोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
सरकारने दिलेल्या मान्यतेनुसार तीन वर्षांत या रिंगरोडच्या कामाचा खर्च जवळपास 22 हजार 375 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसत. अवघ्या तीन वर्षांत प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रिंग प्रकल्पाचा खर्च वाढण्याची कारणे ;
1) रिंगरोडच्या पूर्व भागातील ऊर्से-सोलू ते सोरतापवाडी या रस्त्याच्या कामासाठी 2021 मध्ये 10 हजार 159 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. याच कामासाठी आता 19 हजार 932 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
2) पश्चिम भागातील ऊर्से ते वरवे बुद्रूक या रस्त्याच्या कामासाठी 12 हजार 176 कोटी रुपयांचा खर्चास मान्यता दिली होती. मंत्रिमंडळ बैठकीत आता याच रस्त्यासाठी 22 हजार 778 कोटी रुपयांच्या सुधारित कामास मान्यता दिली आहे.
3) तीन वर्षांपूर्वी पुणे रिंग रोड साठी एकूण 20 हजार 335 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती. परंतु आता याच मार्गासाठी एकूण 42 हजार 710 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
असा असेल पुणे रिंग रोड प्रकल्प –
एकूण लांबी – 137 किलोमीटर
रिंगरोडची रुंदी – 110 मीटर
सुधारित खर्चासह मिळालेली मान्यता – 42 हजार 710 कोटी रुपये
पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात होणार रिंग रोड
– पूर्व मार्ग मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून जाणार
– पश्चिम मार्ग भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्यातील गावांमधून जाणार
पुणे रिंग रोड मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नाशिक-सोलापूर आणि सातारा-बंगळूर महामार्गाला जोडला जाणार.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News
– आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार
– ‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi