Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे.
याबाबत संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. ( Pune Ring Road Project Land acquisition to be done again in 32 villages for additional land )
- रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.
एमएसआरडीसीने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ( Pune Ring Road Project Land acquisition to be done again in 32 villages for additional land )
आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे.
तसेच नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे, हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC