Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शुक्रवारी (दि.९) मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे, वैज्ञानिक प्रयोगांचे गजानन पाटील यांनी कौतुक केले.
अत्याधुनिक संगणक लॅब, लॅपटॉप्स व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण मिळत आहे. याबद्दल श्री. पाटील यांनी संबंधित अधिकारी व शिक्षकांचे कौतुक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शाळेत करण्यात आलेल्या विविध कामांचा यावेळी आढावा घेतला.
पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट व पाहणी –
जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर गजानन पाटील यांनी नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन पाहणी केली. या दवाखान्याच्या माध्यमातून परिसरातील पशुपालकांना मिळणाऱ्या सेवा, जनावरांना मिळणारे उपचार, उपलब्ध असलेल्या लसींचा साठा इत्यादी गोष्टींचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

