Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मावळ तालुक्यातील वरसोली, कान्हे, जांभूळ, कामशेत ग्रामपंचायतींना भेट देऊन उपक्रमांची पाहणी केली.
सीईओ पाटील यांनी पांगळोली येथे ‘पीएम-जनमन’ अंतर्गत कातकरी बांधवांना गायरान जागा मंजुरीचे आदेश प्रदान केले. यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या उपस्थितीत घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्र व शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करत सूचना दिल्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रधान, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी बहिरट, डॉ. रणजित कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी धनंजय देशमुख आदी उपस्थित होते.
- कान्हे जिल्हा परिषद शाळेतील फ्युचरिस्टिक क्लासरूमला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यानंतर जांभूळ व बेबडओहळ ग्रामपंचायतींच्या बचत गटांच्या आर्थिक सक्षमतेबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिरकणी महिला ग्रामसंघ अंतर्गत चारचाकी वाहन प्रशिक्षणाची सांगता झाली व लायसन्स वाटप करण्यात आले.
घरकुलाची कामे पूर्ण करून घ्या
वडगाव मावळ येथील बैठकीत बांधकाम, पाणीपुरवठा विभागांतर्गत अपूर्ण व नवीन कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. बैठकीला तहसीलदार विक्रम देशमुख व सहायक गट विकास अधिकारी सेवक थोरात उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेतून भूमिहिन लाभार्थ्यांना शंभर टक्के जागा उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करावीत. अपूर्ण घरकुले १०० दिवसांतील योजनेंतर्गत पूर्ण करून घ्यावी. पंधराव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री