Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता जिल्हा परिषद सदस्य पदाची आरक्षण सोडत आज सोमवार, दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडले. पुणे जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 73 असून यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण असे आरक्षण काढण्यात आले.
यात अनुसूचित जाती स्त्रिया, अनुसूचित जमाती स्त्रिया, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रिया आणि सर्वसाधारण मधील स्त्रिया असे आरक्षण काढण्यात आले. सोडती द्वारे एकूण 73 जागांमधील 37 जागा या स्त्रियांसाठी राखीव असल्याने तर उर्वरित जागी आरक्षण निहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण जागा आहेत.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषद गटाच्या एकूण पाच जागा आहेत. या पाचही जागांसाठी अनेक इच्छुक उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून कंबर कसून तयारीला लागलेले होते. प्रत्यक्ष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मावळ मधील वातावरण आनंददायी असल्याचे पाहायला मिळालं. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण अपेक्षित होतं, त्या त्या ठिकाणी तेच आरक्षण पडल्याने त्या व्यक्तीकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर मनासारखे आरक्षण न पडलेल्या ठिकाणी संबंधित उमेदवारांमध्ये नाराजी पसरले.
मावळमधील पाचही गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे ;
29 टाकवे बुद्रुक – अनुसूचित जमाती सर्वसाधारण
31 खडकाळे – सर्वसाधारण महिला प्रवर्ग
33 सोमाटणे – सर्वसाधारण महिला प्रवर्ग
30 इंदूरी – सर्वसाधारण महिला प्रवर्ग
32 कुसगाव बुद्रुक – सर्वसाधारण खुला प्रवर्ग
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव । Maval Panchayat Samiti
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा !