मावळ तालुक्यातील पाथरगाव येथे रविवारी (16 ऑक्टोबर) रोजी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्पमित्रांनी तब्बल 14 फुटी अजगर सापाला जीवदान दिले. पाथरगाव येथे एका आदिवासी समाजाच्या झोपडीत अजगर असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली. अन्नाच्या शोधात हा अजगर त्या ठिकाणी आला होता. सर्पमित्रांनी घटनास्थळी जात दुपारी अडीचच्या सुमारास 14 फूट लांबीच्या या इंडियन रॉक पायथन (अजगर) अजगराला सुरक्षितरित्या पकडले आणि नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले. ( Python Life Saved By Wildlife Conservation Society Members Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विशाल केदारी, कालिदास केदारी यांनी अजगराला अगदी सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव (वडगाव मावळ) यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि सदस्य गणेश निसाळ, तुषार अ सातकर, सत्यम सावंत, तुषार ओव्हाळ, जिगर सोळंकी यांच्या मदतीने निलेश गराडे यांनी लगेच अजगराची प्राथमिक तपासणी केली आणि वनरक्षक साईनाथ खटके यांच्या उपस्थितीत अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले.
अधिक वाचा –
Video : निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा, घोराडेश्वर डोंगरावर पसरलीये फुलांची भगवी चादर
पुणे-लोणावळा मार्गावरील कासारवाडीतील रेल्वे फाटक पाच दिवस बंद, वाचा सविस्तर