रायगड ( Raigad ) जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत – खालापूर मतदारसंघात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी ( Irshalwadi ) गावावर रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली ( Landslide ) आणि या दुर्घटनेत संपूर्ण गाव मलब्याखाली दबले गेले आहे. रात्री घटलेल्या या घटनेत जागे असणारे चार पाच तरुण यांचा जीव वाचला असून त्यांनी या घटनेची माहिती पायथ्याशी असणाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्रीपासूनच घटनास्थळी बचाव दल, पोलिस, मंत्री आदी यंत्रणा दाखल होत मदत कार्य सुरु आहे. ( raigad karjat khalapur irshalgad irshalwadi landslide )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, ईरशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही वस्ती वजा गाव एकूण 35 ते 40 घरांचे गाव आहे. या गावावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळली ज्यात चार पाच घरे वगळता बाकी सर्व घरांवर दरड कोसळून ती मलब्याखाली दबली गेली आहेत. साधारण 100 हून अधिक जण या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत वाचवल्यापैकी 4 जण दगावले असून त्यात एका अग्नीशमन दलाच्या जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, एनडीआरएफ टीम, अग्नीशमन दल आदींकडून बचाव कार्य वेगाने सुरु आहे. यासह रात्रीच स्पॉटवर गेलेले मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत यांच्या नंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी जाणार आहेत. जोराचा पाऊस आणि धुके यामुळे बचावकार्य करण्यात अडथळा येत आहे. तसेच घटनास्थळ उंचावर असल्याने येथे कोणतेही वाहन वगरे जात नसल्याने थेट मनुष्यबळासह बचावकार्य करणे हा एकमेव पर्याय या ठिकाणी आहे.
अधिक वाचा –
– भाजपाने भाकरी फिरवली, पक्षाकडून नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त, पुणे – मावळ भागाची जबाबदारी ‘या’ नेत्यावर
– शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान