Dainik Maval News : मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. यातही ग्रामीण भाग असलेल्या पवन मावळ विभागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पवन मावळातील प्रमुख पवना धरण परिसरात मंगळवारी (दि. 24 जून) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 24 तासात तब्बल 102 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
डोंगराळ भाग असलेल्या या क्षेत्रातील सर्वच ओढे, ओहोळ सध्या प्रवाहित झाले असून डोंगरांवर हिरवा शालू पसरला आहे. यामुळे निसर्ग सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पुणे, ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड भागातील नागरिक मावळच्या या ग्रामीण भागात गर्दी करीत आहे. पवन मावळ भागात असणारे तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर हे किल्ले लेण्या आणि धबधबे हे पर्यटरांचे प्रमुख आकर्षण आहे.
पवना धरणात 47.64 टक्के पाणीसाठा –
पवना धरण परिसरात, यातही धरणाच्या बॅकवॉटर भागात सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा वाढला असून धरणातील जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. 1 जून पासून पवना धरण परिसरात 647 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत धरणात 47.64 टक्के इतका पाणीसाठा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकर भरेल, अशी माहिती धरण विभागाचे रजनीश बारिया यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

