Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख जलाशय पवना धरणात ( Pawana Dam ) आजमितीस (दि. 3 जुलै) 66.49 टक्के इतका पाणीसाठा ( Water Storage ) आहे. पवना धरण क्षेत्रात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहे. तसेच धरणाच्या बॅकवॉटर भागात पावासाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
गुरुवारी (दि. 3 जुलै) रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरणात 66.49 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात 24 तासांत 94 मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच जून 1 तारखेपासून घेतलेल्या नोंदीनुसार आतापर्यंत 1022 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला धरणात 18.38 टक्के अर्थात आजच्या तारखेपेक्षा 48.11 टक्के कमी पाणीसाठा होता, अशी माहिती धरण विभागाचे अभियंता रजनीश बारिया यांनी दिली.
मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीयोजना या पवना धरणातील जलसाठ्यावर अवलंबून आहे. यासह पिंपरी-चिंचवड या महानगरासाठी पवना धरण हा पाण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. सध्या धरणात 60 टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठा झाल्याने किमान अर्ध्या वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे. लवकरच पावसाचा जोर वाढून धरण पूर्ण क्षमतेने भरावे, अशी आशा नागरिकांना आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक