Dainik Maval News : पुणे घाट परिसरातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या मावळातील सह्याद्री घाट परिसरात आज (दि. 28) आणि उद्या (दि. 29) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मावळ तालुक्यातील सर्वाधिक पावसाचा भाग असलेल्या लोणावळा – खंडाळा भागात शनिवारी पासूनच (दि. 27) मुसळधार पाऊस सुरू आहे.
रविवारी (दि. 28) सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा भागात गेल्या 24 तासांत तब्बल 88 मि.मी. अर्थात 3.46 इंच इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुणे घाट भागात दोन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, त्यामुळे लोणावळा – खंडाळा सहीत मावळ तालुक्यातील डोंगराळ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज, रविवार असल्याने लोणावळा भागात पर्यटकांची गर्दी आहे. तसेच नवरात्रोत्सव सुरू असल्याने कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचीही मोठी संख्या आहे. या पार्श्वभूमीवर आणि पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन देखील एक्टिव्ह असून वाहतूक कोंडी होणार नाही, कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम