प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थाच श्रीराम नवमीनिमित्त ( Ram Navami 2023 ) आज (गुरुवार, दिनांक 30 मार्च) रोजी मावळ तालुक्यातील ( Maval News ) अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पवनमावळ भागातील प्रभाचीवाडी येथील राममंदिरही भक्तांनी फुलून गेले होते. येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात भजन-किर्तनाचा भक्तांनी आनंद लुटला. ( Ram Navami 2023 ShriRam Janmootsav Celebrations In Famous Temple At Prabhachiwadi In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रभाचीवाडी येथे पवनमावळ परिसरातील गावातील मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासुनच रांगा लावल्या होत्या. रामनवमी निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बरोबर बारा चा ठोका पडला आणि श्री रामचंद्रांना पाळण्यात टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मावळ तालुक्यातील इतर ठिकाणची राममंदिरे देखील भक्तांनी गजबजून गेली होती.
प्रभाचीवाडी येथे गेली तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रभाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीही प्रभु श्री रामचंद्राचा अभिषेक सोहळा विधीपूर्वक पूजा अर्चेने पार पडला. मंदिरात अभिषेक, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
यावर्षी आमदार सुनिल शेळके, माजी चेअरमन गणेश धानिवले, जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नितीन मुरे, सरपंच सोपान सावंत, खंडू कालेकर, अॅड. खंडू तिकोणे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर निकम, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, माजी उपसरपंच रामदास घरदाळे, उन्मेष रिजबुड, सदस्य गोरख डोंगरे, संतोष घारे, पोलीस पाटील नामदेव डोंगरे, प्रल्हाद घारे, गोपाळ जाधव, ह.भ.प.साजन महाराज जाधव, अनिल साबळे, संदिप साबळे, भरत जाधव, चंद्रकांत पवार, बंजरंग निकम, हनुमंत शिंदे, रोहिदास शिंदे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
( माहिती – सचिन ठाकर )
अधिक वाचा –
– ‘सोमाटणे फाटा टोलनाक्यावर टोल फीमध्ये कुठलीही दरवाढ करू नका’, खासदार बारणेंचे आयआरबीला पत्र
– शिलाटणे गावातील दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली सांत्वनपर भेट