मावळ तालुक्यातील शिलाटणे गावातील शिवभक्त दिनांक 10 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त किल्ले मल्हारगड इथून शिवज्योत घेऊन परतीच्या मार्गावर असताना त्यांच्या वाहनाचा पुणे शहराजवळ रावेत इथे अपघात झाला होता. या अपघातात शिलाटणे गाव आणि मावळ तालुक्यातील इतर काही गावांतील एकूण 34 शिवभक्त जखमी झाले होते. त्यातील दोन शिवभक्तांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दिवंगत शिवभक्तांच्या कुटुंबीयांची स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज (गुरुवार, 30 मार्च) रोजी भेट घेऊन सांत्वन केले. ( Sambhaji Raje Chhatrapati Paid Condolence Visit To Families Of Deceased Shivbhakt Of Shilatane Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मावळ तालुक्यातील शिलाटणे या गावातील तरुण मुले शिवजयंती निमित्त ज्योत आणावयास मल्हारगडावर गेलेली असताना परतीच्या वाटेवर रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या वाहनास कंटेनरने मागून जोराची धडक दिली. या अपघातात 34 शिवभक्त जखमी झाले आणि करण शत्रुघ्न कोंडभर ( वय 22 ) व आर्यन सोमनाथ कोंडभर ( वय 12 ) या दोन शिवभक्तांचे दुर्दैवी निधन झाले. शिलाटणे या गावी जाऊन कोंडभर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली”, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
अधिक वाचा –
– अहिरवडे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सांबराचा मृत्यू
– चंद्रकांत पाटलांच्या हस्ते जिल्हा परिषद पुरस्कारांचे वितरण, ‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आढावा बैठक घेणार’ – पालकमंत्री