महाराष्ट्रासाठी ( Maharashtra News ) दिल्लीतून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती दौपती मूर्मू यांनी स्विकारला आहे. तसेच त्यांच्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी 4 आठवपूर्वीच आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. त्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून स्विकारण्यात आला आहे. ( Ramesh Bais Appointed As New Governor of Maharashtra In Place of Bhagat Singh Koshyari )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रमेश बैस हे मुळ रायपूर येथील असून ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री देखील होते. रमेश बैस हे सध्या झारखंड राज्याचे राज्यपाल असून पूर्नी ते त्रिपूरा राज्याचेही राज्यपाल राहिलेले आहेत. मुळ रायपूर येथील असलेले बैस हे यापूर्वी सात वेळा खासदार राहिले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग, ओम माथूर, सुमित्रा महाजन यांची नावे खरे तर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत होती. मात्र रमेश बैस यांची आश्चर्यकारकरित्या निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून भगतसिंह कोश्यारी हे वादात अडकले होते. महापुरुषांच्या बद्दल केलेली अनेक वादग्रस्त विधाने यामुळे त्यांच्याविरोधात अनेक पक्षांनी राज्यभर आंदोलन देखील केली होती. त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरत होती. अशात कोश्यारींनीही आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा प्रगट केल्याने त्यांची उचलबांगडी होणार, हे जवळपास निश्चित होते.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करण्याचा प्लॅन करताय? ही बातमी नक्की वाचा
– वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा इथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत
– मावळ भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याचे नियोजन