Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे गावात एक अत्यंत दुर्मिळ उभयचर प्राणी ‘बॉम्बे सॅसीलियन’ (Bombay Caecilian) आढळून आला आहे. एका बांधकाम साइटजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत हा प्राणी आढळला. ‘बॉम्बे सॅसीलियन’ हा सरीसृप वर्गातील उभयचर प्राणी आहे. तो साप असल्याचे समजून तिथल्या नागरिकांनी प्राणीमित्रांस पाचारण केले. त्यानंतर हा दुर्मिळ प्राणी असल्याचे समोर आले.
वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य रोहिदास कालेकर आणि जिगर सोलंकी त्वरित घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यानंतर हे साप नसून सॅसीलियन असल्याचे स्पष्ट झाले. हा प्राणी पाय नसलेला उभयचर असून त्याचे शरीर लवचिक व मऊ असल्यामुळे तो मातीच्या ओलसर, अंधाऱ्या वातावरणात सहजपणे गडप होतो. प्राथमिक तपासणीत कोणतीही इजा नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला मानवी हस्तक्षेप कमी असलेल्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडून देण्यात आले.
याबद्दल बोलताना पर्यावरणतज्ज्ञ सागर महाजन यांनी, सॅसीलियन हा प्राणी पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा एक अम्फिबियन्स प्राणी आहे, ज्याचे शरीर अत्यंत लवचिक आणि मऊ असते, ज्यामुळे त्याला पृथ्वीच्या अंधाऱ्या, ओलसर आणि गंधक असलेल्या पर्यावरणात सहजपणे गडप होण्याची क्षमता असते.
सॅसीलियन प्रामुख्याने मातीतील कीटक आणि लहान जीव खाऊन जीवनचर्या चालवतात, त्यामुळे ते मातीच्या पर्यावरणातील कीटकांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतात. त्यांचा प्रसार मुख्यत: पश्चिम घाटांमध्ये होतो आणि त्यांना उत्तम पारिस्थितिकी वातावरण पुरवणाऱ्या आणि मानवी हस्तक्षेपापासून जास्त संरक्षण मिळणाऱ्या जंगलात अधिक शोधले जाते. म्हणूनच सॅसीलियनचे संरक्षण पारिस्थितिकी संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम