Dainik Maval News : शक्यतो डोंगराळ किंवा घनदाट जंगलात आढळणारे इंडियन पेंगोलीयन जातीचे खवले मांजर पवन मावळ विभागातील शिवली गावात रविवारी आढळून आले होते. वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी या मांजराला जवळच्या जंगलात सोडून दिले आहे.
शिवली येथील रमेश आडकर यांच्या अंगणात रात्री साडेनऊच्या सुमारास खवले मांजर आढळून आले. हे मांजर घरात शिरताना त्यांनी पहिले, त्यानंतर ग्रामस्थांनी ते पकडून ठेवले. वन्यजीव रक्षक संस्था आणि वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर अनिल आंद्रे, जिगर सोलंकी, शत्रुघ्न रासणकर, रोहित पवार, निलेश ठाकर, संतोष दहीभाते, आदेश मुथा, निखिल साने हे लगेचच शिवली येथे आले.
साधारण 30 किलो वजनाचे, 4 फूट लांबीचे आणि पाठीवर दीड इंच रुंद व दोन इंच लांबीचे खवले असणारे हे मांजर होते, असे अनिल आंद्रे यांनी सांगितले. टीमने सदर खवल्या मांजराला सुखरूप ताब्यात घेतले व त्याची प्राथमिक तपासणी करून लगेचच त्याला वन विभागाच्या हद्दीतील जंगलात सोडून दिले. परिसरात भरपूर लोकवस्ती असल्यामुळे व कुत्र्याच्या भीतीमुळे मांजर घरात शिरण्याचा प्रयत्न करत असावे, असा अंदाज आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
– वंदन दुर्गांना । संस्काराच्या सुपीक जीवनवाटेवर तिने कष्टाचं पाणी ओतलं, श्वासासोबत नृत्य जोडून स्वातीताई बनलीये शास्त्रीय नृत्यांगना