व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

रतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 14, 2024
in पुणे, ग्रामीण
Babasaheb Ambedkar Jayanti

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. आज, दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, प्रदीप पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, व्याख्यान,वही पेन संकलन उपक्रम –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, वही पेन संकलन आदी उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सामाजिक समरसता गतिविधी व स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. कोरोना प्रादुर्भावाचा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता गतिविधीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार यांचे हस्ते झाले, अभिवादन स्थळी येणाऱ्या नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घेतला. समरसता गतिविधी तर्फे ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी ‘ एक वही एक पेन ‘ अभियानातंर्गत संकलित ११०० वही पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले यावेळी देहू गट संघचालक नरेश गुप्ता, समितीचे विजय कांबळे, प्रदीप पवार, सुनील आगळे यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. पिंपळे सौदागर भागात रमेश जाधव यांचे डॉ.बाबासाहेबांचे राष्ट्रीय विचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन तर देहूरोड, पिंपळे सौदागर, पुनावळे, चिखली, निगडी भागात देखील अभिवादन कार्यक्रम झाले.

अधिक वाचा –
– “भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याची आणि पवार साहेब, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ”
– श्री एकविरा देवी चैत्री यात्रा निमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त; यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन – वाचा सविस्तर
– ‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval


Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval

Next Post

तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
awareness for voting

तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.