शिवसेना पक्षाची दोन शकले झाल्यानंतर राज्यासह देशभरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून पक्षांची स्वतंत्ररित्या बांधणी आणि पदाधिकारी नियुक्त्या होत आहेत. मावळ तालुका हा जसा भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्वाची तसाच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून शिवसेना पक्षासाठीही मावळ तालुका आणि मतदारसंघ तितकाच महत्वाचा आहे. तालुक्यात शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर एक मोठा गट खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेला, असे असले तरीही मावळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक स्वतंत्र अशी ताकद आहे. ( reconstruction of shiv sena uddhav balasaheb thackeray party begins in maval taluka pune district )
याच ताकदीच्या जोरावर आता मावळ तालुक्यात शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची पुनर्बांधणी सुरु आहे. त्यानुसार अनेक नव्या निुक्त्या होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार आणि मावळ विधानसभा प्रमुख प्रभाकर पवार यांच्या मान्यतेने आणि स्वाक्षरीने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांतील तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख, समन्वयक आणि सल्लागार यांच्या सहमतीने तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण स्तरावरील नव्या नियुक्त्या खालीलप्रमाणे; ( sena uddhav balasaheb thackeray party announces new appointments at zilla parishad group and panchayat samiti gan level in maval taluka )
कुसगांव – वरसोली जिल्हा परिषद गट
गुरूनाथ पडवळ – विभाग संघटक
वरसोली पंचायत समिती गण
कैलास पडवळ – विभाग प्रमुख
चंद्रकांत मडके – विभाग समन्वयक
संतोष बोंबले – उपविभाग समन्वयक
अक्षय येवले – उपविभाग प्रमुख
रोहित बांगर – उपविभाग प्रमुख
प्रसाद देखमुख – उपविभाग प्रमुख
कुसगाव पंचायत समिती गण
कृष्णा शिळवणे – विभाग प्रमुख
प्रमोद वाशिवले – विभाग समन्वयक
शिवाजी गाडे – उपविभाग प्रमुख
संतोष केदारी – उपविभाग प्रमुख
निलेश ढगे – उपविभाग प्रमुख
सुरज देशपांडे – उपविभाग प्रमुख
वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गट
उमेश गावडे – विभाग संघटक
वडगाव पंचायत समिती गण
योगेश काकरे – विभाग प्रमुख
विजय मराठे – उपविभाग प्रमुख
सुधिर खानेकर – उपविभाग प्रमुख
खडकाळा पंचायत समिती गण
नितीन पिंगळे – विभाग प्रमुख
कांताराम येवले – उप विभाग प्रमुख
अमोल वायभट – उप विभाग प्रमुख
चांदखेड – महागाव जिल्हा परिषद गट
अंकुश वाघमारे – विभाग संघटक
महागाव पंचायत समिती गण
उमेश दहिभाते – विभाग प्रमुख
संतोष शिंदे – उपविभाग प्रमुख
विकास कालेकर – उपविभाग प्रमुख
चांदखेड पंचायत समिती गण
उत्तम तरस – विभाग प्रमुख
राहुल दवणे – उपविभाग प्रमुख
समीर कराळे – उपविभाग प्रमुख
टाकवे वडेश्वर – जिल्हा परिषद गट
वडेश्वर पंचायत समिती गण
गणेश लष्करी – विभाग प्रमुख
हनुमंत ठाकर – उपविभाग प्रमुख
आनंद जांभळे – उपविभाग प्रमुख
रोहिदास असवले – उपविभाग प्रमुख
टाकवे पंचायत समिती गण
जयदास ठाकर – विभाग प्रमुख
विलास आडीवळे – उपविभाग प्रमुख
संतोष साकोरे – उपविभाग प्रमुख
शोभीनाथ भोईर – उपविभाग प्रमुख
सोमाटणे- इंदोरी जिल्हा परिषद गट
रंगनाथ गोपाळे – तालुका उप संघटक
चंद्रकांत भोते – तालुका समन्वयक
युवराज सुतार – उप तालुका प्रमुख
राम सावंत – विभाग संघटक जि.प. गट
भरत भोते – विभाग प्रमुख
सोमाटणे पंचायत समिती गण
संदिप झांबरे – उप विभाग प्रमुख
नितीन बदर – उप विभाग प्रमुख
इंदोरी पंचायत समिती गण
सचिन ढोरे – उप विभाग प्रमुख
दत्तात्रय नाटक – उप विभाग प्रमुख
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी मावळमध्ये सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन
– 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा! पाहा काय आहे दिनविशेष
– कामशेत पोलिसांकडून आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण; विद्यार्थ्यांना नशेच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन