पुणे : सप्टेंबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के ड्रायव्हिंग लायसन्स) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी खेड, 11 आणि 12 सप्टेंबर रोजी मंचर, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी जुन्नर, 25 आणि 26 सप्टेंबर रोजी वडगाव मावळ आणि 27 सप्टेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. ( firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka september 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगावातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याची बतावणी करून दीड लाखांची फसवणूक
– न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यर्थिनींसाठी अद्ययावत स्वछतागृह; महिंद्रा एक्सलो कंपनीचा उपक्रम । Vadgaon Maval
– अबब…! पवनानगर इथे आढळला तब्बल 9 फुटी अजगर, सर्पमित्रांनी दिले जीवदान