व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 4, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट

‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल रमेश बैस

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 28, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Ramesh-Bais-visit-Lonavala

Photo Courtesy : Twitter / DIO Pune


माणसाचे जीवनमान उंचविण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यातही योग उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योगसंस्थेतर्फे आयोजित ‘स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार-2023’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ( Governor Ramesh Bais visit to Lonavala distribution of Swami Kuvalyananda Yoga Award )

कार्यक्रमाला सीबीआयचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ.आर.एस.भोगल, हृषिकेश येथील स्वामी राम साधक ग्रामचे स्वामी रित्वन भारती, रवी दिक्षीत आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री.बैस म्हणाले, ‘योग केवळ निरोगी शरीरासाठीचा व्यायाम नसून ही शरीर, मन आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रिया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट आंतरिक शांती, सद्भावना आणि आत्मसंयमाचा विकास आहे. त्यामुळे विविध प्रकारांच्या आजारांचे प्रमाण वाढत असताना आणि युवा पिढी व्यसनाकडे वळत असताना योगविद्येचा प्रसार अधिक महत्वाचा ठरतो.’

“योगसाधनेद्वारे निर्माण होणारा आत्मसंयम आणि सहनशीलता शांततापूर्ण समाजनिर्मितीत उपयुक्त ठरते. देशातील लाखो युवकांसाठी रोजगाराच्या माध्यमातून समृद्धी आणण्यासाठी योग प्रेरक ठरू शकते. भारताच्या योगविद्येला आज जगाने स्वीकारले आहे. ‘योग दिवस’ साजरा करण्यासोबत आपण ‘योग सप्ताह’ साजरा करण्याचाही विचार करावा. प्रत्येक शाळा-महाविद्यालयात या संदर्भातील आयोजन करण्यात येऊन प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना योगासनाच्या मुलभूत बाबी समजाविल्या जाव्यात” – राज्यपाल रमेश बैस

कैवल्यधाम संस्थेत योगविद्येचे ‘ऑक्सफर्ड’ होण्याची क्षमता असल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले, या संस्थेने जगासाठी सर्वश्रेष्ठ योग शिक्षक तयार करून जगातील विविध देशात आपले केंद्र सुरू करावे. संस्थेने योगविद्येच्या प्रसारासाठी या क्षेत्रात संशोधन करणारे समर्पित विद्यापीठ व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल बैस यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. ( Governor Ramesh Bais visit to Lonavala distribution of Swami Kuvalyananda Yoga Award )

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते #लोणावळा येथे पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, स्वामी रित्वन भारती यांना #स्वामीकुवलयानंदयोगपुरस्कार २०२३ प्रदान. कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ.आर.एस.भोगल आदी उपस्थित..१/२ pic.twitter.com/YATlzrUZvD

— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 28, 2023

राज्यपाल महोदयांच्या हस्ते पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, स्वामी रित्वन भारती यांना कुवलयानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींनी योगाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमपूर्वी राज्यपालांनी कैवल्यधाम योग संस्था परिसराला भेट दिली आणि तेथील ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आपला बाप्पा आपणच बनवुया..! कामशेतमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर, चिमुकल्या हातांनी साकारले आकर्षक गणपती
– कौतुकास्पद! मावळ तालुक्यातील नृत्य शिक्षक राहुल देठे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
– ‘वाट चुकला, खाली कोसळला, दाट तुटले आणि चालताही येईना’, विसापूर किल्ल्यावर युवकाला वाचवण्यासाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन


dainik maval ads may 2025

Previous Post

तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट

Next Post

वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shivdurg-fitness-club

वडगावमधील राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश; अशोक मते यांचा खास सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agriculture farmers damage to agricultural goods damaged farmers agricultural damage

मोठी बातमी : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर

July 4, 2025
Crime

तळेगाव एमआयडीसी ठाणे हद्दीतील आंबी येथील अवैध दारूभट्टीवर पोलिसांचा छापा । Maval Crime

July 3, 2025
Accident

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेत घाटात भीषण अपघात ; दुचाकीवरील दोन तरूण ठार । Kamshet News

July 3, 2025
sand

मोठी बातमी : घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार ; महसूल मंत्र्यांची माहिती

July 3, 2025
Tributes paid to late former MLA Krishnarao Bhegde in both houses of Maharashtra Legislative Assembly

दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात श्रद्धांजली अर्पण !

July 3, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

कुंडमळा पूल दुर्घटना ; चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती, दोषींवर कठोर कारवाई करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

July 3, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.