व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 12, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट

अभिनेता अनिकेत विश्वासराव दिसणार मुख्य भूमिकेतस, तर अल्ताफ दादासाहेब शेख करणार चित्रपटाचे दिग्दर्शन.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 28, 2023
in महाराष्ट्र
karmayogi-abasaheb-ganpatrao-deshmukh

Photo Courtesy : Team Dainik Maval


सोलापूर जिल्ह्यातील  सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करीत आहेत. ( karmayogi abasaheb marathi movie on life of sangola past mla late ganpatrao deshmukh )

मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट निर्मित  या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर, दिग्दर्शक अल्ताफ शेख, स्टार कास्ट व उल्हास धायगुडे पाटील  उपस्थित होते.

तब्बल 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख –

महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांची ओळख होती. सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 55 वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्वं केलं. विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी 2019मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला. ( Ganpatrao Deshmukh who became MLA of Sangola Legislative Assembly for 11 times )

वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा , असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या बहुप्रतीक्षित “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली. ह्या चित्रपटात प्रमूख भूमिका अभिनेता अनिकेत विश्वासराव साकारत असून  हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, निकिता सुखदेव, ‘सैराट’ फेम अरबाज शेख, तानाजी गुलगुंडे, अहमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर, अनिल नगरकर, छोटा पुढारी वृंदा बाळ आदि कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटातील गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे,  वेशभूषा संगीता चौरे व  पोर्णिमा मराठे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर अमजदखान शेख, विशेष सहकार्य उल्हास धायगुडे पाटील यांचे आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! मावळ तालुक्यातील नृत्य शिक्षक राहुल देठे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
– ‘वाट चुकला, खाली कोसळला, दाट तुटले आणि चालताही येईना’, विसापूर किल्ल्यावर युवकाला वाचवण्यासाठी मध्यरात्री रेस्क्यू ऑपरेशन
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह सापडला, कुटुंबीयांनी फोडला हंबरडा


dainik-maval-ads

Previous Post

पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ramesh-Bais-visit-Lonavala

राज्यपाल रमेश बैस यांचा लोणावळा दौरा, स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराचे केले वितरण, कैवल्यधाम योग संस्थेलाही दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी : इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, राज्य मंडळाची घोषणा, ‘असा’ चेक करा निकाल । Maharashtra SSC Result 2025

May 12, 2025
magnificent statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort Malvan

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री

May 12, 2025
Breaking News Indian Legendary Batsman Virat Kohli retired from Test cricket

कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires

May 12, 2025
Rajendra Vahile elected as Secretary of Bhairavnath Education Promotion Board Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदी राजेंद्र वहिले यांची निवड । Vadgaon Maval

May 12, 2025
Maval Taluka Cancel new plan of Malavali railway flyover Locals demand it

मळवली रेल्वे उड्डाणपुलाचा नवीन आराखडा रद्द करा ; स्थानिकांची आग्रही मागणी । Maval News

May 12, 2025
bjp-party-flag

भाजपाच्या मावळ तालुक्यातील पाचही मंडल अध्यक्षांची नियुक्ती ; ‘या’ पाच कार्यकर्त्यांना मिळाली संधी । Maval BJP

May 12, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.