व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय

पवन मावळातील पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात असलेल्या या गावातील नागरिकांना पोस्ट संदर्भात काहीही काम असेल तर थेट 12 ते 15 किलोमीटर अंतर कापत पवनानगर इथे यावे लागत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 28, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
post-office-morave

Photo Courtesy : Avinash Gonate


केंद्र सरकारच्या फायनान्शिअल इन्क्लुझन अर्थात आर्थिक समावेशन योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील दुर्गम भाग असलेल्या चावसर, तुंग, मोरवे भागात स्वतंत्र पोस्ट कार्यालय कार्यान्वित झाले आहे. पवन मावळातील पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात असलेल्या या गावातील नागरिकांना पोस्ट संदर्भात काहीही काम असेल तर थेट 12 ते 15 किलोमीटर अंतर कापत पवनानगर इथे यावे लागत. परंतू आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व पाच सहा गावांसाठी स्वतंत्र पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. ( separate post office for chavsar morve tung villages in pavan maval area )

पुणे ग्रामीण पश्चिम विभाग डाकघर अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांसह एस. डी. मोरे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडूरकर, मच्छिंद्र उगले, व्यंकटेश देशपांडे, रेखा गोडघासे, शर्मा मॅडम आदींच्या हस्ते आणि संजय मराठे, सरपंच नवनाथ कुडले, उपसरपंच सुवर्णा राऊत, माजी उपसरपंच भाऊ काळवीट, भावजी राऊत, राणू मोहोळ, निवृत्ती गोणते, निता मोहोळ, लाला वांजळे पाटील, दत्ता मोहोळ, रामू गोणते, श्याम चव्हाण, विठ्ठल गोणते, चिंधू गोणते, ग्रामसेवक आप्पा भानुसे ह्यांच्या उपस्थित नव्या पोस्ट कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

“ग्रामीण भागातील लोकांचे टपाल वेळेत मिळावे, पोस्ट कार्यालयातील‌ सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता इथे पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना या पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अपघात पॉलिसी, मासिक बचत खाते, चालू बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, मासिक डिपॉझिट, किसान विकास पत्र, 399 किंवा 299 रुपयांत भारतीय डाक अपघात विमा आदी सुविधा प्रदान करण्याचा मानस आहे. तसेच आपल्या गावातच नवीन पोस्ट कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची पायपीट थांबेल.” – बाळकृष्ण एरंडे, डाकघर अधीक्षक – पुणे ग्रामीण पश्चिम विभाग

पवनानगर पोस्ट मास्टर सोपान वायकर, किसनराव ढोले, शंकर लायगुडे यांचे या कार्यात विशेष सहकार्य लाभले. तर कार्यक्रमातील उपस्थितांचे सरपंच नवनाथ कुडले यांनी आभार मानले. ( separate post office for chavsar morve tung villages in pavan maval area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील कामशेत इथे तीन देशी बैलांना कत्तलीपासून वाचवण्यात यश!
– तळेगावात अजित फाऊंडेशनमध्ये अ‍ॅडविक हाय-टेक कंपनीच्या सीएसआर निधीतून संगणक लॅब
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर


Previous Post

आपला बाप्पा आपणच बनवुया..! कामशेतमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर, चिमुकल्या हातांनी साकारले आकर्षक गणपती

Next Post

तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
karmayogi-abasaheb-ganpatrao-deshmukh

तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
Hindu Rashtra Sena warns of protest over various issues related to railway underpass in Wadiwale Kamshet Maval

वाडीवळे येथील रेल्वे भुयारी मार्गासंबंधित विविध समस्यांबाबत हिंदूराष्ट्र सेनेकडून सोमवारी आंदोलनाचा इशारा

May 2, 2026
Agristack Get Farmer ID

शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही

May 2, 2026
SSC-HSC-Exam-Result

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल

May 2, 2026
Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.