Dainik Maval News : आपल्या आचरणातून आई वडीलांचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे लागतील. इतिहास लढणाऱ्यांचा होतो, घरात बसणाऱ्यांचा नाही, असे मत हभप माऊली महाराज पठाडे यांनी कीर्तनरूपी सेवा देताना केले. वेहेरगाव येथे आई एकविरा देवी पायथा मंदिर नूतनीकरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
वेहेरगाव ग्रामस्थ, दानशूर भाविक यांच्या माध्यमातून आई एकविरा देवी पायथा मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पणानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी देवीचा अभिषेक, आरती संपन्न झाली, त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. यासह वेहेरगावातील महिला भगिनींसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी मंदिरासाठी देणगी देणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कर्जत येथील प्रसिद्ध युवा कीर्तनकर हभप माऊली महाराज पठाडे यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न झाली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन श्री आई एकविरा देवी पायथा मंदिर वेहेरगाव, टपरी संघटना, आई एकविरा रिक्षा संघ, समस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro
