Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार मावळ तालुक्यात पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण राहणार हे निश्चित झाले आहेत. तथापी तालुक्याचे मुख्यालय असलेले वडगाव शहर २०१८ मध्ये नगरपंचायत झाल्याने ते वगळण्यात आले असून यामुळे जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणांच्या रचनेत मोठ्याप्रमाणात बदल झाल्याचे दिसत आहे.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गट अशी रचना होती. परंतु महाविकास आघाडीच्या काळात लोकसंख्या वाढीनुसार जिल्हा परिषदेचे ६ गट व पंचायत समितीचे १२ गण अशी रचना करण्यात आली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सन २०२२ पूर्वीच्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आल्याने मावळ तालुक्यात पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण अशी रचना करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरांमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती रचनेमधून वडगाव मावळ शहर वगळण्यात आले आहे. याचा परिणाम प्रामुख्याने तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील गट,गण रचनेमध्ये झाला आहे.
प्रारूप रचनेनुसार गट व कंसात गण पुढीलप्रमाणे :
१. टाकवे बु. गट – (टाकवे बु. व वडेश्वर गण)
२. इंदोरी गट – (इंदोरी व वराळे गण)
३. खडकाळे गट – (खडकाळा व कार्ला गण)
४ कुसगाव बु. गट – (कुसगाव बु. व काले गण)
५. सोमाटणे गट – (सोमाटणे व चांदखेड गण)
गणनिहाय ग्रामपंचायतींचा समावेश पुढीलप्रमाणे :
१. टाकवे बुद्रुक – माळेगाव बु.इंगळून, कशाळ, भोयरे, कोंडीवडे आ. मा., कल्हाट, निगडे, घोणशेत, साई, टाकवे बु., आंबळे
२. वडेश्वर – खांड, डाहुली, कुसवली, वडेश्वर, शिरदे, खांडशी, सांगिसे, मुंढावरे, गोवित्री, उकसान, करंजगाव, कांब्रे नामा, नाणे.
३. वराळे – नवलाख उंबरे, आंबी, वराळे, जांभूळ, साते
४. इंदोरी – जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, माळवाडी, नानोली तर्फे चाकण
५. खडकाळे – कान्हे, चिखलसे, कुसगाव खु., खडकाळे, ताजे
६. कार्ला – टाकवे खु., शिलाटणे, पाटण, मळवली, कार्ला, वेहेरगाव, वाकसई, डोंगरगाव, वरसोली, उदेवाडी, कुणे नामा
७. कुसगाव बुद्रुक – कुरवंडे, कुसगाव बुद्रुक, औंढे खु, देवले, भाजे
८. काले – लोहगड, आपटी, मोरवे, आंबेगाव, तुंग, केवरे, शिळींब, अजिवली, ठाकूरसाई, तिकोना, मळवंडी ठुले, कोथुर्णे, वारू, काले, महागाव, येळसे, कडधे, करूंज, थूगाव, शिवली.
९. सोमाटणे – बौर, मळवंडी पमा, शिवणे, ओझर्डे, आढे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे.
१०. चांदखेड – दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, चांदखेड, धामणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, डोणे, येलघोल, ओवळे, दिवड, पुसाणे, पाचाने, कुसगाव पमा.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी