लोणावळा नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या तुंगार्ली धरणाची काही प्रमाणात दुरावस्था झाली आहे. धरणाच्या भिंतींमधून पाण्याची काही प्रमाणात गळती होत असून धरणाच्या भिंतीवरील संरक्षक कठडे देखील तुटलेले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. ते या धरणाच्या भिंतीवरून जाताना तोल जाऊन जीवितहानी होऊ शकते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच पर्यटकांच्या सोयी आणि देखरेखीसाठी इथे एक पूर्ण वेळ सुरक्षारक्षक देण्यात यावा. यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी, अशी विनंती तुंगार्ली मधील युवक वर्गानी प्रशासनाकडे केली. ह्या वेळी संबंधित लोणावळा नगरपालिकेला देखील पत्र देण्यात आले आहे. लोणावळा नगरपालिकेने लवकरात लवकर यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी निवेदन देणाऱ्या युवकांनी व्यक्त केली आहे. ( representation to lonavala municipal council for repair of tungarli dam )
अधिक वाचा –
– वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार; ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची होणार निर्मिती
– आमदार शेळकेंसमवेत मावळ बाजार समितीच्या संचालकांनी घेतली पणन संचालकांची भेट, ‘या’ विषयांवर झाली चर्चा