Dainik Maval News : भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागातील संकल्प सभा रविवारी (दि. २२ जून) वडगाव मावळ येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव म्हाळसकर यांनी केले. मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, जेष्ठ नेते भास्कर म्हाळसकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते अविनाश बावरे यांनी संकल्प सभेत मोदी सरकारने 11 वर्षात केलेल्या विधायक कामांची माहिती दिली गेली.
- प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना, आयुष्यमान भारत योजना, जल जीवन मिशन, स्टार्ट अप इंडिया, जन धन योजना, राम मंदिर, 370 कलम रद्द करणे, रस्त्याचा विकास, यूपीआईय पेमेंट आदी नवनवीन कार्यातून जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. सामान्य माणूस केंद्र बिंदू ठेवून विकास योजना आखल्या जात आहेत, अशी माहिती कार्यक्रमात दिली गेली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले, आभार अतिश ढोरे यांनी मानले. यावेळी वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, टाकवे बु अध्यक्ष दत्तात्रय असवले, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, माजी सभापती प्रवीण चव्हाण, माजी शहराध्यक्ष किरण भिलारे, संचालक नारायण ढोरे, माजी शहर अध्यक्ष अनंता कुडे, माजी नगरसेवक रवी काकडे, माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे;
सरपंच सविता काजळे, स्वाती पाराठे, युवा अध्यक्ष कीरण जगताप, अतीश ढोरे, प्रवीण शिंदे, हरिभाऊ दळवी, मच्छिंद्र केदारी, रवी शिंदे, संतोष सातकर, विठ्ठल तुरडे, संतोष असवले, अमोल धिडे, सोमनाथ काळे, संतोष कुंभार, विकास घारे, संतोष भालेराव, रुपेश दरेकर, प्रशांत चव्हाण, गणेश शिंदे, रवींद्र काकडे, नितीन कुडे, कुलदीप ढोरे, रामनाथ शेटे, भाऊसाहेब पाराठे, रमेश ढोरे, संतोष सातकर, प्रशांत देशपांडे, लहू तुरडे, नाथा घुले, शेखर वहिले, दिलीप गावडे, खंडूशेठ भिलारे, सोमनाथ काळे, नारायण ढोरे, अक्षय म्हस्के, भूषण मुथा, समीर भोसले उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime