मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट प्रवर्तक यांची संयुक्त आढावा बैठक शुक्रवारी (दि. 14) वडगाव मावळ येथे पार पडली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित महिला भगिनींसोबत संवाद साधला. तसेच सर्व भगिनींच्या कामातील अडचणी व सूचना समजून घेतल्या. या बैठकीला गटविकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे व इतर मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लवकरच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्याअनुषंगाने आमदार शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना, तुमच्या काही समस्या, काही प्रश्न विधानसभेत मांडायचे असल्यास ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका इ. यांच्या काही समस्या असतील त्या सरकारसमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे शेळकेंनी सांगितले. ( review meeting of Asha workers Anganwadi workers women shg promoters of Maval taluka )
कोरोना काळात आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी चांगले काम केले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य, महिला व बाल विकासाच्या दृष्टीने या सर्व भगिनी सतत कार्य करीत असतात. शासकीय योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी या भगिनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गट ही संकल्पना आणली. महिलांना उत्कर्षाच्या अनेक संधी आहेत. ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकते. बचत गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता बँकांनीही पुढाकार घेतला आहे. – आमदार सुनिल शेळके
आपण सर्वांनी एकजूटीने कार्य केल्यास ग्रामीण भागात नक्कीच परिवर्तन घडू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची देखील सक्रियता राहू शकते. यासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सहकार्य नेहमीच करीत आलो आहे. भविष्यकाळात देखील करत राहील, हा विश्वास माझ्या सर्व भगिनींना देतो, अशी प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी दिली.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणूकीपूर्वीच होणार पुणे रिंगरोडचे भूमिपूजन, ‘या’ ठिकाणचे जमिनीचे संपादन पूर्ण । Pune Ring Road Update
– धक्कादायक ! लोणावळा शहरात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक
– पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन