व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणूकीपूर्वीच होणार पुणे रिंगरोडचे भूमिपूजन, ‘या’ ठिकाणचे जमिनीचे संपादन पूर्ण । Pune Ring Road Update

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्प बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

File Image


पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्प बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या पुणे वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड प्रकल्प) भूमिपूजन हे महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वीच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राज्य विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यावर आचारसंहिता लागेल, अशात रिंगरोडचे काम अडकून राहू शकते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच भुमिपूजन होऊन आचारसंहिता लागल्यानंतर या रस्त्याचे काम विनाअडथळा सुरू राहण्यासाठी असे केले जाऊ शकते, त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ( Pune Ring Road Update Bhumi Pujan will be held before Maharashtra Vidhansabha elections )

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर याठिकाणची वाहतूककोंडी मिटवण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. एमएसआरडीसीकडून एकूण 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा हा वर्तुळाकार रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत.

पूर्व मार्गात मावळ तालुक्यातून 11, खेड तालुक्यातून 12, हवेली तालुक्यातून 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांतून हा रस्ता प्रस्तावित आहे. तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील 1, हवेली तालुक्यातील 11, मुळशी तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील 6 गावे प्रकल्प बाधित होणार आहेत. यात पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे, तसेच त्यासाठी 2975 कोटी रुपयांचा मोबदलाही देण्यात आला आहे.

“वर्तुळाकार रस्त्यासाठी पश्चिम मार्गाचे बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूर्व मार्गाचे भूसंपादन प्रगतिपथावर आहे. जुलैअखेरपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. सातत्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येत आहे.” – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

अधिक वाचा –
– पावसाळा सुरू झाला तरीही कार्ला-मळवली पुलाचे काम अपूर्णच ! संतप्त ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन
– घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करताय? मग ही बातमी नक्की वाचा, सरकारी सबसिडी आणि योजनांची माहिती एका क्लिकवर
– विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

धक्कादायक ! लोणावळा शहरात सापडलं नवजात स्त्री जातीचे अर्भक

Next Post

‘जयंत पाटील साहेब… आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा’, आमदार सुनिल शेळकेंचे जयंत पाटलांबाबत मोठे विधान । Sunil Shelke & Jayant Patil

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sunil Shelke big statement about Jayant Patil

'जयंत पाटील साहेब... आम्हाला आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा', आमदार सुनिल शेळकेंचे जयंत पाटलांबाबत मोठे विधान । Sunil Shelke & Jayant Patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.