देहूरोड कॅन्टोमेंन्ट बोर्ड येथे प्रशासनाची आढावा बैठक सोमवार (30 जानेवारी) रोजी घेण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे , भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांसह अनेक पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. देहूरोड कॅन्टोमेंन्ट परिसरातील विविध विकासकामे आणि समस्या आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली गेली. ( Review Meeting Of Dehurod Cantonment Board Administration Concluded In Presence Of Bala Bhegade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी देहूरोड कॅन्टोमेंन्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, प्रशासक कैलास पानसरे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, मदनशेठ सोनिगरा, महावीर बरलोटा, तुकाराम नाना जाधव, सूर्यकांत सुर्वे, विशाल खंडेलवाल, राहूल बालघरे, अमोल नाईकनवरे, उमेश जैन, सारिका मुथा आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते कार्यदेश वाटप
– शिळींब गावात मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचे एनएसएस शिबीर संपन्न, निरोप घेताना मुले झाली भावूक