Dainik Maval News : पावसाळ्यात लोणावळा, कार्ला, आंदर, पवन, नाणे मावळात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. पर्यटकांना सुविधा द्याव्यात. त्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पार्किगच्या जागेत पाणी साचते, तिथे मुरुम टाकून दुरुस्ती करुन घ्यावी. पोलिसांनी पर्यटकांना केवळ धाक दाखवू नये, पर्यटकांना सुविधा द्यावी. चुकीचे कृत्य करणाऱ्या पर्यटकावर कारवाई करावी. अतिउत्साही पर्यटक धबधब्याखाली पाण्यात उतरतात, त्यासाठी कर्मचारी वाढवावेत. वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- खासदार श्रीरंग बारणे हे विधानसभानिहाय बैठक घेत आहेत. त्यानुसार मावळ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक गुरुवारी वडगाव येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान, वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय पाटील, क्षीरसागर उप, धनराज दराडे, कविता पाटील, पोलीस निरीक्षक प्रभापती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, कृषी अधिकारी मारुती साळे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, विविध पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महसूल, कृषी, पाणीपुरवठा सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. आई एकिवरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामाच्या दर्जा राखावा, कामाला गती देऊन पूर्णत्वाकडे न्यावे. कार्ला ते मळवली दरम्यानचा रस्ता अर्धवट आहे. तो पूर्ण करावा. भाजे लेणीपासून लोहगड, विसापूर किल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही अर्धवट आहे. ते पूर्ण करावे. जिल्हा परिषदे अंतर्गत सुरु असलेले रस्त्यांची कामेही तातडीने पूर्ण करावीत.
जलजीवन मिशनअंतर्गत मावळ मतदारसंघात सुरु असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत काही ग्रामपंचातीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कामास सुधारणा करावी. दर्जेदार काम करावे. ठेकेदारांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. अशा ठेकेदारांवर कारवाई करावी. त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्यांच्याकडून पैशांची वसुली करावी, असेही बारणे म्हणाले.
मावळातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. धाब्यावर अवैधपणे मद्य विक्री केली जाते. मावळात एमडी ड्रग मोठ्या प्रमाणात विकले जाते. शाळांजवळ गुटखा विक्री केली जाते. त्यावर कारवाई करावी. साथीचे आजार वाढू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी काही काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी.
हावितरणने पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करुन घ्यावी. ज्या ठिकाणी डीपीची मागणी आहे, तेथे डीपी बसवावेत. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनजागृती करुन सुर्यघर आणि कुसूम योजना लोकांपर्यंत पोहचवावी. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News