Dainik Maval News : अल्पसंख्यांक समाज हा आपल्या राष्ट्राच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजाच्या प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असा निर्धार आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी सोमवारी (दि. 28) व्यक्त केला.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष बाबा मुलानी, महिला तालुकाध्यक्ष शबनम खान, वडगाव शहराध्यक्ष मजहर सय्यद, लोणावळा शहराध्यक्ष हाजी शेख, प्रवक्ते फिरोज शेख ,मुनव्वर ईमानदार , जाकिर खलीफा ,रज्जाक मनियार ,अतिक शेख, मुसा शेख , बाबुलाल नालबंद , जमिर नालबंद यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत अल्पसंख्यांक समुदायासमोरील विविध अडचणी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. मस्जिद, दफनभूमी तसेच इतर सामाजिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आला. आमदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक उत्साहात पार पडली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
– मोठा निर्णय : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ उभारणार ; 18 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
– ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा’ ; लोणावळा भेटीत रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य । Ramdas Athawale
– पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road