Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनी गुरूवारी (दि. 18 जुलै) वडगाव नगरपंचायत हद्दीतील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी, आतापर्यंत वडगाव शहरातील विकास कामांसाठी 65 कोटींचा निधी दिला असून पुढील काळात देखील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी बोलताना सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळ शहरातील विविध कामासंदर्भातील आढावा बैठक नगरपंचायत सभागृहात संपन्न झाली. या बैठकीला आमदार शेळकेंसह मुख्याधिकारी प्रवीण निकम, ज्येष्ठ नेते भास्कर म्हाळसकर, गणेश ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, माजी नगराध्यक्ष, सर्व माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ( Review of development works in Vadgaon Nagar Panchayat by MLA Sunil Shelke )
सदर बैठकीत शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. वडगावमधील नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विचार करुन मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. पाणी योजनेची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते, आरोग्य, वीज, स्वच्छता या पायाभूत सुविधा नागरिकांना सक्षमपणे मिळतील यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. तसेच प्रलंबित विकासकामांना चालना देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन आमदार शेळकेंनी दिले.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates
– बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर
– मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime