व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर

बारावी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रूपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. 

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Chief Minister Youth Work Training Scheme

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील बारावी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल. ( Maharashtra Govt Chief Minister Youth Work Training Scheme Information and Application Process )

  • कार्य प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा राहणार असून या कालावधीत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रूपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय शासकीय योजनांची माहिती जनतेला व्हावी आणि त्या माध्यमातून जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमागे 1 व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे 1 असे एकूण 50 हजार योजनादूत राज्यात नेमण्यात येणार आहेत. यांचेही विद्यावेतन या योजनेतून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही युवांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News
– रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade


Previous Post

मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime

Next Post

लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rain

लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.