Dainik Maval News : पवन मावळातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर येथील चौकामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, असा प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांना पडत आहे. सोबत रस्त्याची दूरवस्था झाल्याने बाजारपेठेत येणारे परिसरातील गावातील नागरिक, आणि स्थानिक यांनाही याचा नाहक भास सहन करावा लागत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत थेट खड्ड्यांत वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढीसाळ कारभाराविरोधात निषेध नोंदविला आहे. यासह सदर रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करण्याबबात निवेदन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
फक्त पवनानगर नाही तर करुंज, कडधे, येळसे, शेवती वसाहत येथेही रस्त्याची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी लहान लहान खड्डे पडून खड्ड्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डयांत पावसाचे पाणी साचल्याने येथून ये-जा करणारे वाहन चालक, प्रवासी, पादचारी आणि नवखे पर्यटक सर्वांनाच अत्यंत त्रास होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे